लातूर जिल्ह्यात कोरोना मुळे 20 रुग्णांचा मृत्यु

लातूर जिल्ह्यात कोरोना मुळे 20 रुग्णांचा मृत्यु

1767 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 36373 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1767 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 20 रुग्णांचा मृत्यु झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 1258 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 454 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसेच प्रलंबित मधील 87 कोरणा बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 4118 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 1226 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 51938 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 14706 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 859 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 36373 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 880 आहे.

About The Author