अल्पवयीन मुलांच्या हातून अमली पदार्थाचा व्यापार!! शिवाजीनगर पोलिसांनी केले हा धंदा हद्दपार!!!
लातूर (कैलास साळुंके) : लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनुषंगाने पेट्रोलिंग करण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी पोलीस उपनिरीक्षक देशमुख मॅडम, पोलीस नाईक चामे, पोलीस शिपाई बोचरे यांना आदेशित केले. सदरील पेट्रोलिंग दरम्यान या पथकाच्या जीपला रस्त्याच्या कडेला एक अल्पवयीन मुलगा संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने त्यास जागेवरच थांबायला सांगून या पथकातील सपोनि संजय देविदास पवार यांनी फिर्याद दिली की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी पेट्रोलिंग करत असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मनपा उद्यान, कॉइल नगर लातूर समोरील मुख्य रस्त्यावर एक संशयित इसम आपल्या ताब्यातील आरटीसी प्रीमियम गोल्ड कॉलिटी राइसच्या पोत्यामध्ये काहीतरी घेऊन जात असल्याचा संशय वाटल्याने या पथकाने त्याला नाव विचारले. त्या विधी संघर्ष बालकाने आपले नाव गणेश असल्याचे सांगितले. त्यास त्याच्या ताब्यातील पोत्याच्या संदर्भात विचारपूस केली असता त्याने या पोत्यामध्ये गांजा हा अमली पदार्थ असल्याचे सांगितले. या पथकाने खात्री केली असता आत गांजा असून आंबट उग्र वास येत असल्याचे पाहिले. त्यास तेथेच थांबवून त्याच्यासोबत त्याच्या सुरक्षेसाठी बोचरे यांना थांबवले. व पुढील रितसर कारवाई करावी असा लेखी रिपोर्ट दिल्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे डायरी मध्ये या घटनेची नोंद नंबर 21 प्रमाणे करून पुढील कार्यवाहीस्तव पोलीस निरीक्षक यांच्या आदेशासाठी पत्र दिले.
वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली. तेव्हा पंच, फोटोग्राफर, हाताचे ठसे तपासणारे इत्यादी सहकारी मदतीला घेऊन कारवाई पूर्ण करण्याचे आदेश केल्यानंतर दोन पंच साक्षीला घेऊन फोटोग्राफरला सोबत घेऊन त्या व्यक्तीच्या ताब्यातील पोत्याची झडती घेऊन तपासणी केली. पोलीस उपनिरीक्षक देशमुख मॅडम, सहाय्यक फौजदार काजी, पोलीस नाईक चामे, माने, पोलीस शिपाई हनुमंते, फोटोग्राफर जाधव, व्हिडिओ ग्राफर पोलीस शिपाई कांबळे, वजन काटा धारक आक्रम शेख यांच्यासह 04:16 पोलीस स्टेशन येथुन निघून मनपा उद्यान काॅइल नगर लातूर समोरील सार्वजनिक रोडवर पोहोचले. गेटसमोरील पश्चिम भागात पोलीस शिपाई बोचरे हा त्या संशयित मुलाला ताब्यात घेऊन थांबलेला होता. त्याच्याजवळ पोहोचून सोबत आलेल्या पंचांना सर्व कल्पना देऊन त्या पोत्यामध्ये असलेल्या गांजा ची माहिती घेऊन त्याचा पंचनामा केला. सदरील पोत्यामध्ये 19260 रुपये किमतीचा गांजा आढळून आला. या गांजाच्या संदर्भात त्या विधी संघर्ष बालकाला हा गांजा कुठून आला? आणि कोठे देणार होतास? असे विचारले असता त्याने सांगितले की, शरीफ लतीफ शेख राहणार कॉइल नगर लातूर यांच्या मालकीचे हे गांजाचे पोती असून मला मजुरी ने लहान पुड्या बनविण्यासाठी दिल्या होत्या. त्या ताब्यात घेऊन जात असताना पोलिसांनी मला पकडले. हे शरीफ लतीफ शेख याने पाहिले आणि तो पळून गेला. सदरच्या मालाचा पंचनामा करून सीए तपासणी, पोलीस स्टेशन सॅम्पल आणि न्यायालय यांच्या साठी छोट्या पुड्या सॅम्पल म्हणून बनवण्यात आल्या तसेच इतर पाकीट चा पंचनामा करून पंचाच्या सह्या घेऊन पोलीस स्टेशन येथे जप्त केले. विधिसंघर्षग्रस्त बालक नामे गणेश यास त्याच्या वयाच्या संदर्भात जिल्हा परिषद प्रशाला लिंबाळा दाऊ तालुका औसा येथून माहिती घेतली असता त्याचे वय 17 वर्ष असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यांच्या संदर्भात वडीलामक्ष विचारपूस करता, आरोपी नामे शरीफ लतीफ शेख राहणार ऑइल नगर लातूर यांनी गांजाच्या लहान पुड्या बांधण्यासाठी सदरचा माल दिला असल्याचे सांगितले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शरीफ लतीफ शेख हा फरार झाला असल्याने त्याला पकडण्यासाठी स्वतंत्र पथक बनविण्यात आले असून शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. सदरील कामगिरी पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक देशमुख, सपोउपनि काझी, पो काॅ चामे, पो काॅ बोचरे, पोलीस नाईक माने यांनी पार पाडली.