जिल्ह्यात 25 रुग्णांचा मृत्यु; नवीन 1643 कोरोनाबाधित

जिल्ह्यात 25 रुग्णांचा मृत्यु; नवीन 1643 कोरोनाबाधित

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 37308 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1643 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 25 रुग्णांचा मृत्यु झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 2058 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 508 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसेच प्रलंबित मधील 39 कोरणा बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 3171 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 1098 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 53566 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 15374 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 884 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 37308 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 935 आहे.

About The Author