ग्रामीण भागात तंबाखूजन्य पदार्थांची छुप्या मार्गाने विक्री

ग्रामीण भागात तंबाखूजन्य पदार्थांची छुप्या मार्गाने विक्री

बंद असतानाही शौकिनांची तलफ वाढली

लामजना (प्रशांत नेटके) : तंबाखू, गुटखा, मावा, सिगारेटवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणले असता या सर्व वस्तूंचे भाव तिप्पट, चौपट वाढले. बंदीत शौकिनांची मोठी लूट सुरू असून पानटपरीवाले छुप्या मार्गाने धूम्रपान वस्तूंची विक्री बिनधास्तपणे सुरूच आहे.

धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांमुळे सार्वजनिक ठिकाणी होणारे थुंकण्याचे प्रकार बंद व्हावेत. यातून संसर्ग टाळला जावा या उद्देशाने शासनाकडून परिपत्रक काढून धूम्रपानावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र याचा गैरफायदा समाजातील अनेकजण बिनधास्तपणे उठवून दुप्पट भावाने विक्री सुरू झाली आहे. बाजारात असो वा किराणा दुकानात कॅरीबॅग व तंबाखूजन्य पदार्थ बिनदास्तपणे विक्री सुरू आहे मात्र प्रशासना कडून कसलीही कारवाई केली जात नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक पानटपरी धारकांनी आपल्या टपऱ्या बंद केल्या आहेत. मात्र अनेकांनी याचा गैरफायदा घेत उठवून धूम्रपान तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू ठेवली आहे. तंबाखूजन्य व गुटखा सिगारेट आदींची छुप्या पध्दतीने गल्लीबोळात विक्री सुरूच आहे. ५ रुपयांना मिळणारी तंबाखू पुडी १५-२० रुपयांना, १० रुपयांचे सिगारेट २५- ३० रुपयांना मिळत आहे.

गुटख्याची व सिगारेटचीही तिप्पट चौपट भावाने विक्री सुरू केली आहे. तरीही शौकीन तिप्पट -चौपट भावाने खरेदी करत आपली तलफ भागवत आहेत. याबाबत अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासनाने कारवाई करून अवैध विक्री रोखावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

About The Author