दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा बँक वृक्षारोपण करणार
लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सहकार महर्षी तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 18 एप्रिल रोजी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यात सर्वच शाखेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे कोरोना चे सावट असल्याने पर्यावरण ला पूरक वातावरण निर्माण व्हावे यासाठी लातूर जिल्हा बँक kovid 19 च्या नियमाचे पालन करून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे यांनी दिली.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षी लोकनेते विलासराव देशमुख साहेब व राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात येते पण यावर्षी kovid ची मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याने व जिल्हा बँकेतील अधिकारी कर्मचारी यांनी kovid ची लस घेतली असल्याने रक्तदान शिबिर पुढे ढकलण्यात आले असून पुढील काही दिवसांत रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे
वृक्षारोपनाचा कार्यक्रम 18 एप्रिल रोजी लातूर व प्रत्येक तालुक्यातील 10 तालुका शाखेच्या आवारात होईल तसेच बँकेच्या स्वमालकीच्या जागेत ग्रामीण भागात असलेल्या शाखेत होत असून शासनाच्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखून स्थानीक बॅंकेचे संचालक व इतर स्थानीक मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येणार आहे अशी माहिती बॅंकेचे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव यांनी दिली आहे.