लामजना येथील कोविड केअर सेंटर ची पाहणी

लामजना येथील कोविड केअर सेंटर ची पाहणी

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांची भेट

लामजना (प्रशांत नेटके) : सध्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने औसा तालुक्यातील लामजना येथील सामाजिक वसतिगृहात शासकीय कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.दिनांक १७ एप्रिल शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच सूचना केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय ढगे, तहसीलदार शोभा पुजारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेख , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, ग्रामविकास अधिकारी एस के गिरी, मंडळ अधिकारी आर एस हाश्मी, औसा पालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, सरपंच खंडेराव फुलारी, उपसरपंच बालाजी पाटील, तलाठी सदाशिव हेंबाडे, आरोग्य सेवक राजेंद्र उजळंबे, आदी उपस्थित होते.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ शेख यांनी कोविड सेंटरमधील माहिती देऊन सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा व सुविधा देण्याच्या सूचना केल्या. तसेच नागरिकांना वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

About The Author