विद्यार्थ्यांनो, हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्टवर्क करा : पोलीस उप-अधिक्षक निकेतन कदम

विद्यार्थ्यांनो, हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्टवर्क करा : पोलीस उप-अधिक्षक निकेतन कदम

अहमदपूर ( गोविंद काळे ) : स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासाचे आणि ग्राउंडचे सातत्य महत्त्वाचे आहे. हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्टवर्क करा, पण सातत्य ठेवा, असा सल्ला आयपीएस निकेतन कदम यांनी विद्यार्थ्यांना दिला.

तालुक्यातील रुद्धा पाटी येथील ज्ञानदीप पोलीस मिलिटरी अकॅडमीचा वर्धापन दिन दि. ४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अकॅडमीचे संचालक उद्धव इप्पर होते.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. आयपीएस निकेतन कदम म्हणाले, स्पर्धा परीक्षा असो किंवा पोलीस भरती यासाठी स्वप्न, समर्पण व शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे. या तीन गोष्टी साध्य केलात तर हमखास यशस्वी व्हाल तसेच अत्यावश्यक वेळेसच मोबाईलचा वापर करा, जास्तीत जास्त वेळ अकॅडमीतच राहून ग्राउंडची आणि अभ्यासाची तयारी करा असा मोलाचा संदेश दिला.

अध्यक्षीय समारोपात उद्धव ईप्पर ज्यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. अमोल वाघमारे यांनी केले. आभार प्रा. चिमणराव कांबळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. नितीन गुट्टे, राम मेजर, जितेंद्र मेजर, प्रा.राहुल ढवळे, संदीप मुसळे, संदीप नरवटे, महिला प्रशिक्षक ऋतुजा बनकर, अर्चना करपे आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!