ज्ञानदीप मिल्ट्री पोलिस अॅकॅडमी अहमदपूरचा ११ वा वर्धपानदिन साजरा
अकरा वर्षात ॲकॅडमीचे अनेक विद्यार्थी नोकरीत !
अहमदपूर( गोविंद काळे ) : आयपीएस मंचकराव ईप्पर यांच्या कल्पनेतून ज्ञानदीप अकॅडमीची माळरानावर स्थापना केली आहे. संचालक उद्धव इप्पर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. या अकॅडमीमध्ये शिक्षण घेणारे शेकडो मुले मुली स्वतःच्या पायावर उभे असून आज ते नोकरीत कार्यरत असल्याचे संचालक उद्धव इप्पर यांनी सांगितले.

सुरुवातीला व्हीजीटर, पालक अकॅडमी पाहण्यासाठी किंवा भेट देण्यास आल्यानंतर ते म्हणायचे तुमचे विचार चांगले आहेत पण येथे माळरान आहे. आजू बाजूला झाडे नाहीत त्यामुळे पाल्याला येथे करमणार नाही म्हणून निघून जायचे. येथील परिसरात कोणीच राहत नव्हते. पहिल्याच महिन्यात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून आज तागायत येथे शेकडो मुले व मुलीं दाखल होत आहेत आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणत नोकरीवर आहेत. येथील विद्यार्थी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, स्टाफ तसेच राज्यातील कानाकोपऱ्यात नोकरीत आहेत. मुलासोबतच मुलीही अकॅडमी मध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. त्याही अनेक क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. या महागाईच्या काळातही फक्त जेवणाचे वर्षभराचे पैसे घेऊन विद्यार्थ्यांना वर्षभर सांभाळण्यात येत असते. येथे मेहनत, सराव, अभ्यास करवून घेतला जातो. येथील शिस्त, सातत्त्य, मेहनत, आयपीएस अधिकारी मंचकराव ईप्पर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे
