नांदेड जिल्ह्याच्या एस आर ओ पदीएम जी पाटोळे रुजू

नांदेड जिल्ह्याच्या एस आर ओ पदीएम जी पाटोळे रुजू

नांदेड (प्रतिनिधी) : नाशिकरोड आर एम एसचे कर्तव्यदक्ष एम जी पाटोळे यांची सुपरवायझर पदावरून एस आर ओ पदी नांदेड येथे पदोन्नती झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
नाशिकरोड आर एम एसचे दिलदार तथा दंबग म्हणून परिचीत असलेले कॉ एम जी पाटोळे यांची सुपरवायझर पदावरून नांदेड आर एम एसच्या सब रेकॉर्ड ऑफिसर (एस आर ओ) पदी पदोन्नती होताच.(ता 08 रोजी) एम जी पाटोळे यांनी नांदेड आर एम च्या एस आर ओ पदाचा पदभार स्वीकारला.कॉ एम जी पाटोळे यांनी नाशिकरोड आर एम एस ला असतांना त्यांनी ऑफीस कामकाजात महत्वपूर्ण सिस्त लावली होती.त्यामध्ये ऑफिस स्वच्छतेबद्दल अधिक महत्त्व दिले .तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला सुखदुःखात धावून जाणारे कर्मचारी प्रिय म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख आहे. परंतु आता नाशिकच्या धर्तीवर नांदेड आर एम एस चा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे. शिस्तप्रिय एम जी पाटोळे यांची एस आर ओ पदावर विराजमान होताच विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!