सात वर्षीय बहिण -भावाने धरला पवित्र रोजा
उदगीर (प्रतिनिधी ) : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरु आहे .पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा (उपवास) पूर्ण करून उदगीर शहरातील मुसा नगर येथील कु. झिकरा अझरोद्दीन शेख (वय वर्षें ९ ) व अब्दुल्ला अझरोद्दीन शेख ( वय वर्षे ७ ) या बहिण भावाने जगाचा निर्माता अल्लाहप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. सध्याचे तापमान पाहता रखरखत्या उन्हात पहाटे पाच वाजेपासून सायंकाळी ६:४२ वाजेपर्यंत अन्नाचा एक ही कण आणि पाण्याचा एक ही घोट न घेता दिवसभर उपाशी पोटी राहून त्यांनी अल्लाहप्रती आपली श्रद्धा व्यक्त केल्या. विशेष म्हणजे शेख कु. झिकरा अझरोद्दीन शेख (वय वर्षें ९ ) व अब्दुल्ला अझरोद्दीन शेख ( वय वर्षे ७ ) या बहिण भावाने रोजा (उपवास) करून आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आजी आजोबा व परिवारातील सदस्य यांनी त्यांना पुढील उज्ज्वल भविष्य व चांगल्या आरोग्या करिता अल्लाह कडे प्रार्थना केली. त्यांचे समाजाच्या विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.
