इफ्तार पार्टी म्हणजे एकतेचा संदेश – आमदार संजय बनसोडे

इफ्तार पार्टी म्हणजे एकतेचा संदेश - आमदार संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : समाजातील एकोपा वाढवण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन समाज बांधवांकडुन करण्यात येते. या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांकडुन रोजा धरुन ३० दिवस कडक उपवास केले जातात. प्रत्येक धर्माचा मूळ अर्थ प्रेम आहे. आपुलकी , जिव्हाळा आहे. आपण कोणाची निंदा करायची नाही, कोणाची निंदा ऐकायची नाही, वाईट कुणाचे करायचे नाही. हे पावित्र रोजच्या महिन्यात पालन होत आहे.

माणुसकी धर्माची शिकवण देणाऱ्या उच्च प्रतीच्या मानवी सद्गगुण्यांना चालना देणाऱ्या या पवित्र रमजान महिन्याच्या आ. संजय बनसोडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुकबरे नवाबान मस्जिदमध्ये इफ्तार पार्टी आयोजीत करण्यात आली होती. यावेळी आ.बनसोडे उपस्थित बांधवांना संबोधित करत होते.यावेळी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, मौलाना हबीबुर रहमान, भंन्ते नागसेन बोधी, माजी आ. गोविंद केंद्रे , माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, शिवाजी केंद्रे, मौलाना अब्दुल अजीज, शेख समीर, सय्यद ताहेर हुसेन, प्रा.मल्लेश झुंगास्वामी, बाळासाहेब मरलापल्ले, प्रा.श्याम डावळे, अहमद सरवर,शमशोद्दीन जरगर, सनाउल्ला खान, शेख अलीम, फय्याज शेख, इब्राहिम शेख, फकीर हाशमी, फिरोज देशमुख,फारुकी, कुणाल बागबंदे आदी उपस्थित होते. यावेळी मुस्लिम बांधवासह इतर समाजबांधव ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!