आर्य वैश्य समाजाच्या वतीने आ.संजय बनसोडे ‘विकास पुरुष’ पुरस्काराने सन्मानित
उदगीर (एल.पी.उगीले): उदगीर मतदार संघाचा गेल्या २-३ वर्षात कायापालट करुन शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधिचा निधी खेचुन आणुन सर्व घटकांचा विकास करत असुन त्यांचा विकास कामाचा धडाका सुरु आहे, म्हणुन माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांना आर्य वैश्य समाज उदगीरच्या वतीने ‘विकास पुरुष’ पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार आ.बनसोडे यांना आर्य वैश्य मित्रमंडळ, उदगीर आयोजीत उपवर – उपवधु परिचय मेळाव्यात प्रदान करण्यात आला.उदगीर मतदार संघातील मागील अनेक वर्षाचा विकासाचा बॅकलॉग माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांनी भरून काढला व मतदारसंघात विकासाची गंगा आणली. मागील २ वर्षाच्या कोरोना सारख्या महामारीच्या काळातही आ.बनसोडे यांनी आपल्या मतदारसंघात तळ ठोकून होते, व आपल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत होते. या कठीण काळातही शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामासाठी दोन हजार कोटी पेक्षा जास्त निधी शासनाकडून उपलब्ध करून घेवुन मतदार संघाला प्रगतीपथावर घेवुन जात आहेत. महाराष्ट्रात मतदार संघाची नवी ओळख निर्माण केली. देशाच्या नकाशावर उदगीर शहराची एक साहित्यनगरी म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे, ती केवळ आ.बनसोडे यांच्यामुळेच! त्याच बरोबर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी ते सतत धडपडत असतात. गोर गरीब व कष्टक-यांचे नेतृत्व ते करत असुन शहरात विविध समाजासाठी भवनची निर्मिती त्यामध्ये लिंगायत भवन, बौद्ध विहार, आण्णाभाऊ साठे सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन, शासकीय विश्रामगृह, प्रशासकीय इमारत, पंचायत समितीची इमारत, तहसीलची इमारत, मुस्लीम शादीखाना, पाण्यासाठी वाटरग्रीड योजना, तिरु बँरेजेस, जळकोट उदगीर शहरात महापुरूषांचे पुतळे, मतदार संघाला जोडणारे सर्व मुख्य रस्ते, शहरातील अंतर्गंत रस्त्यासह नागरिकांना विविध मूलभूत योजना आदीसह विविध विकास कामे केली असुन असे विकास काम करणारे कार्यसम्राट लोकप्रतिनिधी मतदार संघाला भाग्याने मिळाले म्हणून आ. संजय बनसोडे यांना ” विकास पुरुष ” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी उद्योजक विजय सुरसेटवार, समाज कल्याणचे उपायुक्त डॉ. अविनाश देवशेटवार, वंदना फुटाणे, सुरेश महाजन, गोदावरी महाजन, अविनाश रायचूरकर, डॉ. तानाजी चंदावार, रमाकांत रायवाड ,टिंकू पारसेवार, नाथा कोटलवार, गोविंद देबडवार, बालाजी चन्नावार, यांच्यासह समाजाचे अध्यक्ष सचिन चन्नावार, सचिव अजय गौशटवार, कोषाध्यक्ष वैभव कोटलवार, उपाध्यक्ष अक्षय मुक्कावार, पवन पारसेवार, सहसचिव स्वप्निल गौशटवार, रोहन कोटलवार, तेजस कोटलवार, सहकोषाध्यक्ष सागर सुरशेटवार, अक्षय मलगे, श्रीनिवास रायचुरकर आदी उपस्थित होते. यावेळी आर्य वैश्व समाजातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
