डॉ. सुमित संगुळगे यांचा सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरातील विकासनगर मध्ये राहणाऱ्या डॉ. सुमित संजय संगुळगे या विद्यार्थ्याने नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस अंतिम परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन यश प्राप्त केले आहे.तोगरी (ता. उदगीर) येथे प्राध्यापक असलेले संजय बाबुराव संगुळगे यांचा मुलगा डॉ. सुमित संगुळगे हे एम. बी. बी.एस. परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश प्राप्त केले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचा मित्र परिवाराकडून सत्कार करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, अव्होपाचे अध्यक्ष प्रा.संजय चन्नावार, सचिव विजयकुमार गबाळे, उपाध्यक्ष संजय पत्तेवार, डॉ. व्यंकटेश मलगे, संतोष कोटगिरे, विठ्ठल बावगे, बालाजी पत्तेवार, महेश येरनाळे, प्राचार्य वंदना बिराजदार, प्रा. गुणवंत काळगापुरे, बाबुराव संगुळगे, ईश्वर संगुळगे, सुशील संगुळगे, मनोज महाजन, बालाजी संगुळगगे, कृष्णा महाजन, गजानन पत्तेवार, प्रशांत गबाळे, राहुल मलगे, राजेंद्र पोकलवार, दत्ता सुरवसे व पंडीत जवाहरलाल नेहरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्याल्यातील शिक्षक, प्राध्यापक आदींनी डॉ. सुमित संगुळगे यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे.
