महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी व दिनविशेष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजी महाविद्यालय ,उदगीर येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुरेश शिंदे यांचे परिवर्तनाच्या चळवळीत महात्मा फुले यांचे योगदान या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके होते, तर मंचावर उपाध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश तोंडारे ,सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम. संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, प्रा.डॉ.एस.एम.सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ.शिंदे म्हणाले की, शिक्षणातून समाज परिवर्तन होईल ही महात्मा फुले यांची धारणा होती, मानव केंद्री विचार धर्माची चिकित्सा करून नवीन मांडणी केली. त्यांच्या विचारातून अनेक पुरोगामी चळवळीचा जन्म झाला. अध्यक्षीय समारोपात तिरुके म्हणाले की, महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत जाण्यासाठी अशा व्याख्यानांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. महापुरुषांचे विचार आत्मसात करून आपल्या जीवनात आचरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.दीपक चिद्दरवार यांनी करून दिला, सूत्रसंचालन प्रा.डॉ.एम.एस सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा.डॉ.बी.एस.भुक्‍तरे यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!