विद्या वर्धिनी हायस्कूल मध्ये महात्मा फुले यांची जयंती साजरी

विद्या वर्धिनी हायस्कूल मध्ये महात्मा फुले यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्या वर्धिनी हायस्कूल मध्ये थोर समाजसेवक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील शिक्षक अत्तार जमील यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून उपस्थिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.बी नागरवाड, पर्यवेक्षक व्ही.एम बांगे. कार्यालय प्रमुख डी.पी सूर्यवंशी,के.एम राजुरकर,के.बी पाटील, कलाशिक्षक एन.आर जवळे, आय.बी कांबळे, गफूर कोतवाल यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत कर्मचारी, विद्यार्थी यांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एस जाधव यांनी केले तर आभार विपुल बोरोळे यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!