विद्या वर्धिनी शाळेत मराठी विषयाच्या भिंती पत्रकाचे विमोचन

विद्या वर्धिनी शाळेत मराठी विषयाच्या भिंती पत्रकाचे विमोचन

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्यावर्धिनी हायस्कूल येथील कला शिक्षक तथा मराठी विषयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक एन.आर जवळे यांनी शाळेतील अनेक विद्यार्थ्याकडून मराठी विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित भिंती पत्रकाचे विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात बनवून घेतले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो.या भिंती पत्रकामध्ये मराठी व्याकरणाचा भाग, विरुद्धार्थी शब्द,समानार्थी शब्द, सुविचार,म्हणी,वाक्यप्रचार, कविता, निबंध, जोडशब्द, काळाचे प्रकार, क्रियापद, नाम, नामाचे प्रकार इ. अनेक विषयावर भिंती पत्र विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतले आहे. यामध्ये अतिशय सुंदर अक्षरात भिंती पत्र तयार केलेल्या वैष्णवी मोरे, वेदिका पाटील,आदिती गोरटे, अक्षरा मळगे,जानवी कांडनगिरे,श्रेया केंद्रे,अनविता पोतदार,नेहा महाजन,शुभांगी शिंदे,श्वेता लामदाडे, राजरत्न भोसले इ. विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.बी नागरवाड, पर्यवेक्षक व्ही.एम बांगे, मार्गदर्शक शिक्षक एन.आर जवळे,के.एम राजुरकर,व्ही.जी राठोड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!