गंगापुर गावची अंधत्व मुक्त गावाकडे वाटचाल !
उदगीर (एल.पी.उगिले) : तालुक्यातील मौजे गंगापूर या हंगदारी मुक्त असलेल्या गावाचे आणखी एक पाऊल पुढे पढत आहे.उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय व संगम पटवारी यांच्या संयुक्त विद्यमानाने गंगापुर गावा मध्ये 30 जुन 2021 पासून उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीरचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटीया यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्र तपासनी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी करत आहेत.या गावची लोकसंख्या 1229 असून गावातील घरे 200 आहेत.या गावात उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर यांच्या मार्फत अनेक वेळा शिबीर घेऊन घरोघर जाऊन तपासनी करून मोतीबिंदू,डोळ्यात मास वाढलेले,ज्यांना चष्मे आवश्यक आहेत, अशा लोकांना चष्माचे नंबर काढुन दिले आहेत.तर मोतीबिंदू असलेल्या 42 रुग्णावर उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर येथे शस्त्रक्रिया रूग्नालयातील तज्ञ डॉक्टर यांनी यशस्वी केली आहे.या मोहिमेमध्ये रूग्नालयाचे सुरेश तिवाडी,श्याम मोदानी,सचिन निलंकर,प्रतिक जाधव, विष्णू पवार,सौरभ गड्डमेवार,गणेश मुंडे यांनी काम पाहिले.तर माजी पोलीस पाटील चंद्रराव पाटील,माधव धनराज पाटील, गंगापुर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच गणेश बिरादार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थानी सहकार्य केले.
