जातिवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

जातिवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील मौजे देऊळवाडी येथील एका व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ करून समूहासमोर अपमानित करून, काठीने मारहाण करून, जबर जखमी केल्याप्रकरणी वाढवणा पोलीस स्टेशन येथे पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात वाढवणा पोलिसांकडून हाती आलेली माहिती अशी की, दिगंबर ज्ञानोबा गडीकर (वय 64 वर्ष रा. देऊळवाडी ता. उदगीर) याने रीतसर फिर्याद दिली की, आरोपी गंगाधर शेषराव फड, यशवंत परसराम केंद्रे, धोंडीबा नामदेव केदार, माधव पंढरी काटवटे, गणेश बालाजी केंद्रे या पाच लोकांनी मिळून दिनांक सहा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास देऊळवाडी येथील हनुमान जयंतीच्या निमित्ताने फिर्यादीचा चुलत भाऊ रमेश पांडुरंग गडीकर यांने गाव जेवणाची पंगत चालू असताना, तेथील लोकांचे जेवण झालेल्या पत्रावळी फिर्यादी उचलत असताना यातील आरोपी क्रमांक एक याने, “मांगट्या तुझे काय काम आहे?” म्हणून शर्टाला धरून ओढत नेले. आरोपी क्रमांक दोन याने त्यास ढकलून दिले. व “मारा या मांगट्याला” म्हणून लोक जमा केले. त्यावेळी गंगाधर फड याने त्याच्या हातातील काठीने फिर्यादीचे कमरेवर मारून कमरेचे हाड मोडले. त्यावेळी आरोपी क्रमांक तीन व चार यांनी “मांगटे लय माजलेत” म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. व लाथा बुक्क्याने पोटात मुक्का मार दिला. व आरोपी क्रमांक पाच याने “गावातील मांगट्यांना मी खिशात घेऊन फिरतो”. अशी शिवीगाळ केली व “तू पोलीस स्टेशनला गेलास तर तुला गावात राहू देणार नाही.” अशी धमकी दिली. अशा पद्धती ची एम एल सी जबाबवरून वाढवणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. क्रमांक 82/23 कलम 326, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 भारतीय दंड विधान संहिता सह कलम 3 (1) (r) (s),3(2)(v) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील गुन्हा वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एन पी पठाण यांनी दाखल केला असून या प्रकरणातील पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत कदम हे करत आहेत.

About The Author

error: Content is protected !!