बीएसपीचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित

बीएसपीचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टी च्या वतीने दि. १६ एप्रिल २०२३ रोजी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. हे शिबीर पंचायत समितीच्या बीआरसी सभागृहात सकाळी१० ते ५ या वेळेत होणार असून आंबेडकर प्रेमींनी या शिबीरास उपस्थित राहण्याचे अहवान बीएसपीचे प्रदेश सचिव व्यंकट बरगे यांनी केले आहे.
बहुजन समाज पार्टी उदगीरच्या वतीने एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार असून या प्रशिक्षण शिबीरास बसपानेते संदेश जगताप हे मार्गदर्शन करणार आहेत. तर शिबीराचे उद्धघाटन सुर्यकांत सोनफुले यांच्या हस्ते कलण्यात येणार आहे. प्रमुख उपस्थिती संजय वाघमारे, डॉ. अनिल कांबळे, सिध्दार्थ सुर्यवंशी हे मान्यवर राहणार आहेत. याकर्यक्रमास पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बरगे यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!