गोवंश वृद्धीचा संकल्प ही काळाची गरज – डाॅ.रामप्रसाद लखोटीया
उदगीर (एल.पी.उगीले) : गो शाळा संगोपन सोबत सोमनाथपुर गोरक्षण संस्थेत 250 लहान मोठया गाई आहेत.त्यामुळे गोवर्धन गौवंश यांचे संगोपन ही काळाची गरज आहे. असे गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटीया यांनी आयोजित गोवंश गोवर्धन प्रकल्प महाराष्ट्र शासन अंतर्गत कडबा कुटी मशीन च्या शुभारंभ प्रसंगी बोलतांना सांगितले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. रामप्रसाद लखोटीया होते. व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीत सागर महाजन, मोतीलाल डोइजोडे,विक्रम हलकीकर,प्रशांत मांगरूळकर,दत्ता वाकुडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्रथम फित कापुन, मशनीरीची पुजा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार गौरक्षण संस्था सोमनाथपुर यांच्या वतिने शाल, श्रीफल देऊन करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात बोलताना गोरक्षण संस्थांनचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया म्हणाले की, राज्यात सध्या लहान -मोठय़ा जवळपास 950 गोशाळा असून शासकीय आर्थिक मदतीशिवाय जनावरांचे संगोपन व सांभाळ करणे गोरक्षण संस्थांना अवघड होत आहे.गोशाळा दान दात्यांच्या विश्वासावर चालत आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत दान दात्यांची संख्या कमी होत आहे.जनावरांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. परिणामी गोशाळेत त्यांचे संगोपन व सांभाळ करणे कठीण होत आहे. त्यामुळे गोवर्धन गोवंश संकल्प व संगोपन काळाची गरज बनत असून दाते यांनी आर्थिक मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन ही डाॅ.रामप्रसाद लखोटीया यांनी केले आहे.
