महेश अर्बन बँकेला बँको ब्लू रिबन २०२२ चा पुरस्कार
अहमदपूर ( गोविंद काळे ) : सहकार आणि व्यापारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूर येथील अविज् पब्लिकेशन, पुणे येथील गॅलक्सी इन्मा या सहकारी बँक संदर्भ ग्रंथ संस्थेकडून महेश अर्बन बँकेला बँको ब्लू रिबन २०२२ या पुरस्काराने नुकतेच महाबळेश्वर येथे सन्मानित करण्यात आल्याबद्दल अहमदपूर येथे बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब, जेष्ठ मार्गदर्शक संचालक आमदार बाबासाहेब पाटील साहेब, उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे साहेब, सहा. व्यवस्थापक सिद्राम रंदाळे साहेब, प्र. व्यवस्थापक प्रशांत मांडवकर साहेब यांचा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ठेवी, सीआरएआर, एनपीए, सतत ‘ए’ वर्ग ग्रेड, व अद्ययावत बॅंकिंग सुविधांच्या साहाय्याने ग्राहकाभिमुख सेवा उपलब्ध करून सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याने बँको पुरस्कारावर यशाची मोहोर उमटवली आहे. विभागातून बँकेला हा पुरस्कार जाहीर झाला असून सुमारे २७ वर्षापूर्वी स्थापना झालेल्या महेश अर्बन बँकेने सहकार क्षेत्रामध्ये अद्ययावत ग्राहकाभिमुख बँकिंग सुविधा उपलब्ध करून देत आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. महेश बँकेने ग्राहकांना बँकिंग सेवा देण्यासाठी अद्ययावत बॅंकिंग सेवासुविधांचा अवलंब केला आहे.
यावेळी सांबअप्पा महाजन, महेश बँकेचे संचालक आशिष गुणाले, संचालक मुजीब पटेल, संचालक डि.के. जाधव, संचालक विनायकराव भोसले, संचालक सतिश कल्याणे, संचालक नैनालसिंग जहागीरदार, संचालक सुदर्शन मुंडे, संचालक पुरुषोत्तम पुरोहीत, तज्ञ संचालक धनंजय दारफळकर आदींची उपस्थिती होती.
