अहमदपूरमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्पचे आयोजन

अहमदपूरमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्पचे आयोजन

अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथे श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा ॲड मानसी हाके पाटील आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी जीवन विकास महिला संस्थेच्या अध्यक्षा डॉ आश्विनी टोंपे यांच्या वतीने प्रथमच उन्हाळी सुट्टीमध्ये दि २० एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान दहा दिवसीय समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, दि २० एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान दोन गटांसाठी सदरील कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून एक गट वयवर्ष ५ ते ८ असून दुसरा गट वयवर्ष ९ ते १२ साठी ठेवले आहे.पहिल्या गटासाठी कागदी हस्त कला, चिकणमाती पासून हस्तकला बनवणे कथाकथन,मैदानी खेळ, आरोग्य तपासणी शिबिर,कुंभारकाम कार्यशाळा, मुलभूत पाककला बनवणे,झुंबा, चित्रकला आदी कार्यक्रमांचा समावेश आहे तर दुसऱ्या गटांसाठी काचकाम हस्तकला,त्रिआयामी कागद कला, मुलभूत पाककला बनवणे,सांघिक स्पर्धा,झुंबा, नृत्य प्रशिक्षण सादरीकरण, इंग्रजी संभाषण कार्यशाळा म्हणजे स्पोकन इंग्रजी, विविध प्रकारच्या क्रीडा कार्यशाळा, योगासने शिबीर आदींची तयारी करुन घेण्यात येणार आहे.तसेच यासाठी अगदी मोफत बससेवा उपलब्ध करण्यात आली असून समर कॅम्पचे शुल्कही अगदी नाममात्र रुपये १००० असून वेळ दररोज सकाळी ९ ते १२.३० पर्यंत संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूर येथे राहणार आहे.तेव्हा सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ॲड मानसी हाके पाटील आणि डॉ आश्विनी टोंपे यांनी केले असून ९६७३९१०५४०,९७६५५८८२३७,९७६३८०२५१९ या क्रमांकावर संपर्क साधून दि १८ एप्रिल पर्यंत नोंदणी करता येईल.तसेच दि ३० एप्रिल रोजी निरोपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून यात विविध स्पर्धांचे निकाल घोषित करून संबंधितांना बक्षीस वितरण होणार आहे तसेच समर कॅम्पमध्ये सहभागी सर्वांनाच प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे संयोजकांनी सांगितले.

About The Author

error: Content is protected !!