महाराजस्व अभियान अंतर्गत डिग्रस येथे नळेगाव पाणंद रस्ता खुला करण्याचा शुभारंभ
उदगीर (एल.पी.उगीले): उदगीर तालुक्यातील महाराजस्व अभियान अंतर्गत आनंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मौजे दिग्रस येथे प्रविण मेंगशेट्टी उपविभागीय अधिकारी उदगीर यांच्या हस्ते व रामेश्वर गोरे तहसीलदार उदगीर यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी डिग्रस गावातील सर्व जनतेला व शेतकरी यांना शेतीला जाण्यासाठी असलेले सर्व वहिवाट रस्ते, पानंद रस्ते, शिवरस्ते, शेत रस्ते या महिन्यामध्ये अतिक्रमण मुक्त करून घ्या. याचे मजबुतीकरणाचे काम २ मे पासून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. हे आदेश देणार आहेत, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे सांगितले.
उदगीर तालुक्याचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी शेतकरी यांनी जास्तीत जास्त लोकसहभाग घेऊन सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त करावेत, अशी आहवान केले. मौजे डिग्रस येथे पहिल्या रस्त्याचा शुभारंभ झाला आहे. प्रत्येक रस्त्याच्या शुभारंभाला मी स्वतः हजर राहील व कोणत्याही प्रकारची अडचण शेत रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी येणार नाही. आली तर त्याची कायदेशीररित्या सोडवणूक करेल. तरी सर्वांनी या अभियानात सहभाग घेऊन आपले गाव अतिक्रमण मुक्त शेतरस्ते करावे असे सांगितले.
यावेळी सरपंच सौ. चंद्रसेना ढगे,उपसरपंच सौ शालुबाई कोपले,मंडळ अधिकारी पंडित जाधव, ग्राम विकास अधिकारी किरण गजभारे, तलाठी अनुराधा अलगुले, पांडुरंग ढगे ,श्रीकांत कोंम्पले ,प्रदीप ढगे ,अभंग ढगे ,गंगाधर ढगे, अकबर शेख, हनुमंत दंडीमे, निवृत्ती दंडीमे, प्रकाश ढगे, विनायक ढगे, विलास ढगे, वसंत ढगे, शांतिनाथ ढगे, शांतिनाथ बोईनवाड, विनोद ढगे, सौदागर माने, रामराजे माने, बालाजी बोईनवाड, सचिन पुट्टेवाड, लक्ष्मण ढगे, वजीर शेख, नामदेव कोंबडे, संगमेश्वर स्वामी , बंदेअली शेख यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी यांनी शेतकरी वसंत ढगे व अभंग ढगे यांचा सत्कार करून शुभारंभ केला. या कामाचे नियोजन मंडळ अधिकारी पंडित जाधव व तलाठी अनुराधा अलगुले यांनी केले होते.
