सहाय्यक पोलीस अधिक्षक निकेतन कदम यांची 11 जुगार अड्यावर धाड ; 45 जणांवर गुन्हा दाखल
अहमदपूर ( गोविंद काळे ) : लातुर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची अवैध धंद्यावर कारवाई, अहमदपूर पोलीस स्टेशन च्या हदीमध्ये 11 ठिकाणी छापेमारी. 45 इसमाविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये 03 गुन्हे दाखल. 2 लाख 7 हजार 840 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे
या विषयी पोलीसांकडून मिळालेली सविस्तर माहीती अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते.त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सर्वच पोलीस ठाणे व उपविभाग स्तरावर अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक (अहमदपूर) निकेतन कदम यांचे मार्गदर्शनात व अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने अधिकारी व अंमलदार यांचे एक स्वतंत्र पथक तयार करून सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी स्वतःच्या नेतृत्वात विशेष मोहीम राबविली.
अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अहमदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या अकरा ठिकाणी अचानकपणे छापा मारले असता तेथे इसम नामे-
1) सुरज हिरालाल राउने, वय 30 वर्ष रा. गवळी गल्ली अहमदपूर
2 ) अष्टवीनायक प्रकाश गायकवाड, वय – 20 वर्ष रा. महेबुब नगर अहमदपूर
3) विशाल अर्जुन सरकाळे ,वय 40 वर्ष रा. सिध्दार्थ नगर अहमदपूर
4) मारोती व्यकट गायकवाड, वय 65 वर्ष रा. हाळणी ता. अहमदपूर
5 ) संजु विठठल पोतणे, वय 50 वर्ष रा. तळेगाव ता. अहमदपूर
6 ) दिलीप यादव गायकवाड, वय 42 वर्ष रा. काळेगावप ता. अहमदपूर
7) बळीराम मारोती देवकत्ते, वय 40 वर्ष रा. विळेगाव – ता. अहमदपूर
8 ) बाबु मेहबुब शेख, वय 34 वर्ष रा. फत्तेपुरा ता. अहमपूर
9 ) खलील जमील सय्यद, वय- 28 वर्ष रा. मेहबुब नगर अहमदपूर
10) बाबा मेहबुब सय्यद, वय- 20 वर्ष रा. फत्तेपुरा ता. अहमदपूर
11 ) प्रल्हाद किशनराव पोतवळे, वय 65 वर्ष रा. बेलुर ता. अहमदपूर
12 ) रवी बनसोडे रा. अहमदपूर
13) अमीरअली अहमद अली लष्करी, वय 58 वर्ष रा. गडीगली, अहमदपूर
14) दताजय सिताराम वाघमारे, वय – 37 वर्ष रा रा. सूनेगाव सांगवी ता. अहमदपूर
15) बलराम रूपलाल बटावाले, वय 35 वर्ष रा. महादेव गली, अहमदपूर.
16) शेख जानीमीया अहमद, वय 45 वर्ष रा. विळेगाव ता. अहमदपूर.
17) रामेश्वर काशीराम गोविंदवाड, वय 28 वर्ष रा. नांदूरा ता अहमदपूर.
18) साहेबराव सुभाष सूर्यवंशी वय 40 वर्ष
19) देविदास शिवाजी चव्हाण,वय 51 वर्ष रा. रूई तांडा ता अहमदपूर.
20) बापूराव मारोती केंद्रे, वय 65 वर्ष रा. ब्राह्मवाडी ता. अहमदपूर.
21)नागोराव शामराव तरडे, वय 50 वर्ष रा. थोडगा ता. अहमदपूर.
22) विजय बळीराम सोमवंशी, वय-41 वर्ष रा. लाईन गली, अहमदपूर.
23)बालाजी किशनराव बटावाले, वय 30 वर्ष रा. हामणे गली, अहमदपूर.
24) बबलू ऊर्फ हबीब खेजर हबीईसा चाऊस रा. गडीगली, अहमदपूर.
25) ईम्राण लतीफ बायजित रा. अहमदपूर
26) सोहेल शेख रा. अहमदपूर
27) फारूख शेख रा. अहमदपूर
28)सोनु ओमलाल राऊत्रे, वय 28 वर्ष रा. गवळी गल्ली अहमदपूर
29) कुमार संदीपान गायकवाड, वय 33 वर्ष रा. तळेगाव
30) अमर नारायण कांबळे,वय 25 वर्ष रा. चापोली
31) संपत दशरथ बनसोडे, वय 65 वर्ष रा. बौध्द नगर अहमदपूर
32) संग्राम नागनाथ वाघमारे, वय 55 वर्ष रा. परचंडा ता. अहमदपूर
33) कमलाकर सोपान आचार्य, वय 45 वर्ष रा. परचंडा
34) मारोती वैभव कोत, वय 32 रा. बेलुर ता. अहमदपूर
35) ज्यावेद इमामसाब चौधरी, वय 33 वर्ष रा. न्यु बागवान कॉलनी अहमदपूर.
36) कलीम गौस शेख,वय 39 वर्ष रा. महेबुब नगर अहमदपूर.
37) दाऊत मैनोचीन सय्यद, वय 27 वर्ष रा. न्यू बागवान कॉलनी अहमदपूर.
38) शुभम राऊत्रे वय 24 वर्ष रा. गवळी गल्ली अहमदपूर
39) शकील गुलाबसाब शेख, वय 39 वर्ष रा. सिंदगी.
40) रुक्माजी नागनाथ वाघमारे, 32 वर्ष रा. नांदुरा
41) लक्ष्मण जळभा पेडलवाड, वय 24 वर्ष रा. चारटांगी अहमदपूर
42) नितीन गंगाराम चरवाचारपटे, वय 25 वर्ष रा. चवंडा नगर अहमदपूर.
43) गणेश मदनलाल बरटिये, वय 22 वर्ष रा. चदंडा नगर अहमदपूर
44) अतिक शेख रा. अहमदपूर
45) देवा भगत रा. अहमदपूर
असे अनेक इसम वेगवेगळ्या ठिकाणी ग्रुप करून स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आले.त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 2 लाख 7 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
नमूद आरोपी विरोधात पोलीस ठाणे अहमदपूर येथे1) गुन्हा रजिस्टर क्रमांक 205/2023, कलम 12(अ) मुंबई जुगार कायदा 2) गुन्हा रजिस्टर क्रमांक 206/2023, कलम 12 मुंबई जुगार कायदा
3) गुन्हा रजिस्टर क्रमांक 207/2023, कलम 12 मुंबई जुगार कायदा अन्वये 03 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांची चाहूल लागताच पळून गेलेले फरार इसम नामे
1)बबलू चाऊस
2) इमरान लतीफ भाईजीत
3)सोहेल शेख
4)फारुख शेख
5)अतिक शेख
6) रवी बनसोडे
7)देवा भगत
असे असुन यांचा पोलीस पथक शोध घेत आहेत नमूद गुन्ह्यात सदर इसमाना लवकरच अटक करण्यात येणार आहे .
दाखल गुन्ह्यांचा तपास अहमदपूर पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर निकेतन कदम यांचे नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,चाकूर व अहमदपूर येथील पोलीस अधिकारी,अंमलदारांनी केली आहे.
