जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा निकाल जाहीर(माध्यमिक गटातून प्रथम अनिता खडके तर द्वितीय महादेव खळुरे विषय साधनव्यक्ती गटातून कामाक्षी पवार प्रथम)

अहमदपूर ( गोविंद काळे ) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण सांस्था मुरुड जिल्हा लातूर तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2022-23 चा जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले.
वर्षभरात शाळांमध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी अनेक उपक्रमशील शिक्षक बांधव विविध नवोपक्रम राबवित असतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे नवचैतन्याचे वातावरण निर्माण होते. मुलांना प्रगत बनवण्यासाठी शिक्षक बांधव आपापल्या परीने नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करतात.
अशा नवोपक्रमशील शिक्षकाच्या उपक्रमाला महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे( SCERT ) संशोधन विभाग मार्फत प्रतिवर्षाप्रमाणे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2022-2023 आयोजित करण्यात आले.या स्पर्धेत प्राथमिक गट व मुख्याध्यापक व माध्यमिक गट,विषय साधनव्यक्ती गट,पर्यवेक्षकिय गटातील अनेक शिक्षक बांधवांनी सहभाग नोंदविला.
या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी लातूर जिल्हातील 10 शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र मुरुड डायट यांच्या वतीने या स्पर्धेत सहभागी नवोपक्रमांची योग्य प्रकारे मूल्यमापन करुन
नवोपक्रमातील नाविन्यता तपासण्यात आले.यातूनच निवडक व नाविन्यपूर्ण उपक्रमाची जिल्हास्तरावर निवड करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडक नवोपक्रमास नावे पाठवून देण्यात आली.
सदरील पुरस्कार शंभुलिंग शिवाचार्य विद्यालय लातूर येथिल विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.माध्यमिक गटातून प्रथम श्रीमती अनिता खडके जि.प.प्रशाला भादा ता.औसा,द्वितीय महादेव खळुरे यशवंत विद्यालय अहमदपूर व प्राथमिक गटातून
प्रथम-गोपाळ भुतापल्ले जि.प.प्रा.शाळा रायवाडी,
,द्वितीय-सुर्यकांत बोईनवाड जि.प.प्रा.शाळा रुई दक्षिण ,तृतीय-प्रमोद हुडगे जि.प.प्रा.शाळा आटोळा, उत्तेजनार्थ श्रीमती प्रभावती वडजे,शेख जाकिर,संगिता चिट्टे,तर विषय साधन व्यक्ती गटातून श्रीमती कामाक्षी पवार (प्रथम) अशा पद्धतीने उपक्रमशील शिक्षकाच्या नवोपक्रमाची निवड झाली आहे.
या राज्यस्तरीय नवोपक्रमातील सर्व गुणवंत व सहभागी शिक्षकांचे विभागिय संचालक गणपतराव मोरे,डायटचे प्राचार्या डाँ भगिरथी गिरी मँडम ,प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे मँडम,माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी ज्येष्ठ अधिव्याख्याता डाँ जगन्नाथ कापसे,डाँ राजेश गोरे,जिल्हा समन्वयक सतिष भापकर,विषय साहाय्यक निशिकांत मिरकले,
तालुक्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी,मुख्याध्यापक ,तज्ञ शिक्षक,विशेष शिक्षक साधन व्यक्ती जिल्हातील सर्व नवोपक्रम स्पर्धेतील गुणवंत शिक्षकांचे अभिनंदन केले.
