डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा विचार क्रांतीचा अत्तदिप व्हावा – प्रा.बालाजी आचार्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा विचार क्रांतीचा अत्तदिप व्हावा - प्रा.बालाजी आचार्य

अहमदपूर- ( गोविंद काळे ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ , अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी सार्वजनिक जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पंचशील ध्वजारोहण प्रसिद्ध विचारवंत प्रा. बालाजी आचार्य यांनी केले त्यानंतर ते पुतळ्यासमोर अभिवादन सभेत आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की,
तथागत गौतम बुद्धाच्या नंतर या पृथ्वीतलावरी तेजस्वी सुर्य म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत. अभिवादनसभेत शुक्रवार दि १४ एप्रिल रोजी केले
या कार्यक्रमाचे उद्घघाटन माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील याच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीचे नेते गोपीनाथराव जोंधळे हे होते यावेळी त्रिशरण पंचशील घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेला सुरुवात झाली विचारपीठावर रिपाईचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे , राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे , सपोनि शैलेश बंकवाड, स्वागताध्यक्ष डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी ,डॉ ओ एल किनगांवकर , विद्रोही कवी राजेंद्र कांबळे, विधीज्ञ अँड भारतभूषण क्षीरसागर, सिनेट सदस्य निखिल कासनाळे , नगरसेवक राहुल शिवपुजे, नगरसेवक अभय मिरकले ,प्राचार्य एम बी वाघमारे , दयानंद वाघमारे, दत्तूमामा कांबळे , दिगंबर गायकवाड ,जीवन गायकवाड , बाबासाहेब वाघमारे , जयंती समितीचे अध्यक्ष प्रकाश अण्णा फुलारी. तत्पूर्वी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शासनाच्या वतीने अहमदपूर चे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सतीश बिलापट्टे, शेख मुसाभाई, पुरी साहेब, दिलीप ससाने, सुहास गायकवाड, इत्यादी कर्मचारी व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार मंडळाच्या वतीने पुष्पहार देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी केले.
यावेळी पुढे बोलताना प्रा आचार्य म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आखिल विश्वात मोठ्या उत्साहात संपन्न होतेय कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचे प्रतीक आहेत त्यांनी स्वयंप्रज्ञेचा आणि स्वाभीमाना वारसा दिला . भारतीय संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य ,बंधुता आणि न्याय , हक्क दिले दिन दलितांचा उद्घार केला म्हणून जगात एकच साहेब आहेत असा बुलंद आवाज निनादतोय एक साहेब बाबासाहेब …..
संपूर्ण जगात आपल्याला बाबासाहेबांचे वारसदार म्हणून ओळख दिली हिच ओळख आपल्याला जबाबदारी जाणीव करून देते त्यामुळेच शैक्षणिक ,सामाजिक , ,सांस्कृतिक , धार्मिक राजकिय प्रगती झाली पण मनुवादी विचारसरणीचे लोक खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरणात भांडवलशाही ला पोसून आरक्षण रद्द करून शैक्षणिक, मुलभूत सुविधा या पासून वंचित ठेऊन संविधानाला चपराक देण्याचे काम करत आहेत आंबेडकरी चळवळीतील नेते , कार्यकर्ते यांनी जागरुक राहून संविधानीक मार्गाने आंदोलन केले पाहिजे आणि जयंतीचा आनंदोत्सव साजरा करताना वैचारिक पद्धतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पेरणी करून रुजवणूच करावी आणि उर्जा आणि प्रेरणा घेण्याचे आवाहन ही केले यावेळी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच मंगळसुत्र बांधुन कार्य केलो म्हणून आमदार आणि मंञी झालो बाबासाहेबाच्या विचाराचे मारेकरी कोण आहेत हे आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते यांनी ओळखावे आणि मतदान करावं जयंतीत नाचा आणि वाचा असा विचार ही मांडला तत्पूर्वी जीवन गायकवाड , अभय मिरकले, सुजित गायकवाड, शिवानंद हेंगणे, बाबासाहेब वाघमारे, आदिनी मनोगत व्यक्त केले तर गोपीनाथराव जोधळे यांनी अध्यक्षीय समारोप केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी सार्वजनिक जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी साठी अरुण भाऊसाहेब वाघंबर, कलीम अहमद , शुभम वाघबर , आदित्य वाघंबर, सचिन गायकवाड,आकाश व्यवहारे ,बाबु भाईशेख,आदिनी परिश्रम घेतले, सूत्रसंचालन दयानंद वाघमारे यांनी केले तर आभार सौ अंजली वाघंबर यांनी सर्वांचे मानल. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक / उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!