आरोग्यदुत डॉ. नामदेवराव कदम (IAS) यांचा शिरूर ताजबंद येथे सत्कार

आरोग्यदुत डॉ. नामदेवराव कदम (IAS) यांचा शिरूर ताजबंद येथे सत्कार

शिरूर ताजबद( गोविंद काळे ) भारत सरकारचे आरोग्यदुत डॉ . नामदेवराव कदम (I A S)यांनी आज किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नेते दिलीप पाटील यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट दिली . यावेळी डॉ. कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सत्कार – अभिष्टचिंतन चहापान कार्यक्रम झाला . यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष बालाजी पडोळे, भाजपा नेते शिवराज पाटील अबेगावकर, मोहनराव पाटील आजनीकर, पंढरी चेबळे आजनीकर, पत्रकर दिलीप मोरे ,अॅड . राहुल चेबळे, आदि चेबळे, शिवाजीराव जाधव सह कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी आरोग्य विभागाच्या विषयावर केंद्र सरकार राज्य सरकार च्या योजना महत्वपूर्ण विषयावर तसेच लातूर जिल्हा लोकसभा कार्यक्षेत्रात आसलेल्या गावा गावात सरकार राबवत आसलेल्या योजना भाजपा संघ परिवार तसेच निष्टावंत कार्येकर्ते यांच्या भेटी घेवून संघटना वाढवण्याचे कार्य आदी बाबीवर सविस्तर चर्चा झाली . आगामी काळात आरोग्य शिक्षण च्या योजना राबविणार असे डॉ. कदम यांनी यावेळी सांगीतले .

About The Author

error: Content is protected !!