शिरूर ताजबंद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठीक ठिकाणी अभिवादन

शिरूर ताजबंद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठीक ठिकाणी अभिवादन

अहमदपूर ( गोविंद काळे )भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येते ठीक ठिकाणी महामानवाला अभिवादन करत मोठ्या उत्साहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा माजी सरपंच साहेबराव जाधव यांच्या शुभहस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करत अभिवादन करण्यात आले.
ह्यावेळी सरपंच मच्छिंद्र वाघमारे, प्रमुख व्याख्याते प्राध्यापक हरिदास तमेवार, प्रा.द मा माने सर, ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील, किसन कापसे,अनिल लामतुरे, ग्रामपंचायत सदस्य श्यामाबाई सरवदे,माजी उपसरपंच प्राध्यापक प्रताप पाटील,पोलीस पाटील उत्तमराव वाघमारे,व्हाईस चेअरमन गोविंद कापसे,महेश बिलापट्टे, शिवानंद भोसले, कोयले पाटील,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बळीराम मोरे,उपाध्यक्ष तथा मार्गदर्शक माधव सरवदे, सचिव धर्मपाल सरवदे, ज्येष्ठ पत्रकार बाबुराव श्रीमंगले,पत्रकार तथा भाजपा तालुका उपाध्यक्ष बालाजी पडोळे, चंद्रशेखर तोगरे, यांच्यासह भीमा अनुयायी,बोध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
तर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मच्छिंद्र वाघमारे यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
शिरूर ताजबंद येथील बस स्थानकात शिवशक्ती एसटी कर्मचारी संघटना प्रतिनिधी रमेश जाधव व वाहतूक नियंत्रक प्रल्हाद सिंगरवाड यांच्या शुभहस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
तर पोलीस चौकीत पोलीस जमादार संतोष ठाकरे यांच्या शुभ हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी पोलीस नाईक केशव जायभाय, पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर चोले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!