तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते रस्ता मजबूती करणाची सुरुवात
अहमदपुर ( गोविंद काळे ) जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या आदेशानुसार जिल्यातील सर्व क्षेत्र नकाशावरील रस्ते १ हे पर्यंत खुले करून देण्यात येणार असल्यामुळे तालुक्यातील मौजे विळेगाव येथे शेत रस्ते करणे व मजबूती करणं करणे या विषेश योजने अंतर्गत येथील मनोज कचरु घारे यांच्या शेतीपासून ते बालाजी गणपती देवकत्ते यांच्या शेती पर्यंत अंदाजे एक किमीच्या रस्त्याचे अतिक्रमण काढून मा. तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते कामाला सुरुवात करण्यात आली. नकाशावरील सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त करून मजबूती करणं करण्यात येणार असल्याचे गावातील शेतकऱ्यांना सांगितले. गावातील अंधव्यक्ती फतरु महम्मद शेख यांच्या घरी भेट देऊन विचारपूस केली त्यांच्या उपजिविकेसाठी मा. तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी त्यांच्या खिश्यातून फतरु शेख यांना आर्थिक मदत दिली व काही कारणास्तव राशन बंद करण्यात आले होते त्यांची सर्व कागदपत्रे घेऊन स्थानिक राशन दुकानदारास तात्काळ राशन पुरवठा करण्याचे आदेश दिले. संजय गांधी निराधार योजने अंतर्गत त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी तात्काळ योजनेत नाव समाविष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी मंडळ अधिकारी एस.टी. वाघे तलाठी एन.बी. कराड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विष्णू देवकत्ते, स्वस्थ धान्याचे चेअरमन ज्योती सोळंके, पोलिस पाटील विजय घारे, मंगेशदास तेलगे, मनोज घारे, बालाजी देवकत्ते यांच्यासह गावातील नागरिकांची उपस्थिती होती.
