बिदर जिल्ह्यातील औराद विधानसभा प्रभारीपदी कुणाल बागबंदे यांची निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव कुणाल किरण बागबंदे यांनी आपल्या कार्यातून कॉंग्रेस पक्षात स्थानिक ते राष्ट्रिय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे.कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठतेसह राजकीय व सामाजिक हित संबंध टिकउन ठेवले असल्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक राज्यातील पदाधिकाऱ्यासह राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक सुरु असून कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न चालू आहेत. यामुळे कॉंग्रेस पक्ष वेगवेगळी रणनिती आखत असून मतदारापर्यंत पोहंचण्यासाठी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्या सोबतच शेजारील महाराष्ट्र व इतर राज्यातील कांही निवडक पदाधिकारी यांच्यावर या निवडणूकीची जबाबदारी टाकण्यात आली आहे. याच अनुषंगाने कर्नाटक युवक कॉंग्रेसचे प्रभारी बंटी बाबा शेळके कल्याण, कर्नाटकचे प्रभारी अजित सिंगजी यांच्या तर्फे औराद तालुक्याच्या विधानसभा प्रभारीपदी युवक कॉंग्रेसच्या औराद विधानसभा मतदार संघाच्या प्रभारीपदी कुणाल बागबंदे यांची निवड करण्यात आली आहे. गॅरंटी कार्डच्या माध्यमातून डोअर टू डोअर कॅम्पेनिंगची तसेच स्थानिक संघटन व प्रचार यंत्रणाची अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे. ही निवड कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री डी.के शिवकुमार व कार्याध्यक्ष काँग्रेसचे नेते ईश्वर खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रासह इतर राज्यातील प्रदेश कार्यकारिणीतील निवडक पदाधिकाऱ्यातून ही निवड करण्यात आली आहे.
कुणाल बागबंदे यांच्या या निवडीबद्दल उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण भैया पाटील मुरूमकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजयकुमार निटुरे,कॉंग्रेस तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील,कृ.उ.बा.चे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव उषाताई कांबळे, माजी उपसभापती रामराव बिरादार, शहराध्यक्ष मंजूरखॉं पठाण,माजी नगरसेवक राजकुमार भालेराव,अमोल घुमाडे,महेश तोडकर, तुषार बुलबुले, गणेश भुसागरे, गणेश पांढरे, सागर सोलापुरे तसेच उदगीर शहर व तालुक्यातील सर्व कॉंग्रेस पदाधिकाऱी व मित्र परीवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
