विनायकराव बेंबडे यांना डॉ. मनिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील इस्मालपूर येथील ग्राम विकास बहुउद्धेशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विनायकराव बेंबडे यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुणे येथील पद्मश्री डॉ.मनिभाई देसाई प्रतिष्ठान व पंतप्रधान नरेंद्र मोदी आरंभित निती आयोग भारत सरकार संलग्नीत व राष्टसेवा समिती महाराष्ट राज्य यांच्या वतीने डॉ. मनिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आला आहे. विनायकराव बेंबडे यांनी जोपासलेली सेवाभावी वृत्ती, समाजसेवेचा व आदर्श कार्याचा गौरव व्हावा, म्हणून हा पुरस्कार दिला असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.रविंद्र भोळे तसेच उपाध्यक्ष अशोक पाटील.यांनी पत्राद्वारे कळविले आहे.यासाठी हा पुरस्कार देऊन दि. २७ एप्रिल २०२३ रोजी पुणे येथे एका शानदार कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल श्री पांडूरंग विद्यालय कल्लूर येथील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इस्मालपूर, कल्लूर, एकुर्का रोड, तोंडार, उमरगा मन्ना, अनुपवाडी परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
