श्री स्वामी समर्थ केंद्रात मुख्य बालसंस्कार केंद्रात देशभक्तीचे धडे
उदगीर (एल.पी.उगीले) : अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरुपीठ श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर द्वारा संचलित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बाल संस्कार मुख्य केंद्र रामचंद्र नगर उमा चौक नांदेड रोड उदगीर या केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त साक्षात परब्रम्ह स्वरूप गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र दादासाहेब व नितीन भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल संस्कार वर्गाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी उदगीर शहरातील, परिसरातील विविध भागातील बाल संस्कार केंद्राच्या विद्यार्थिनी सहभाग नोंदवून थोर महापुरुष यांची वेशभूषा परिधान करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या थोर महापुरुषांची व सैनिक ,संतांची आठवण करून दिली. या कार्यक्रमात आदित्य सताळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,दीक्षा माने – सावित्रीबाई फुले, अमृता पिसारे – झाशीची राणी, परी बाविस्कर – भारत माता, पृथ्वी नागरगोजे – समाजसेवकांच्या भूमिकेत येऊन भारतीय संस्कृतीची व देशभक्तीची ओळख करून दिली. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापिका सुमित्रा वट्टमवार, नागेंद्र काकडे,विशाखा गादा, तानाजी केंद्रे,राजश्री पाटील, सचिन बामनपल्ले , निवृत्ती जवळे यांनी मार्गदर्शन केले.
