अक्षरनंदन शाळेची यशाची परंपरा कायम

अक्षरनंदन शाळेची यशाची परंपरा कायम

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील अक्षरनंदन मराठी प्राथमिक शाळेची यशाची परंपरा कायम ठेवत बी. डी. एस. या स्पर्धा परीक्षेत उत्तम गुण घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत,इयत्ता सहावी मधून 6 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले. यामध्ये प्रिया फुले, श्रेया जाधव, बस्वकिरण पाटील, संतोष हाके, आदर्श शिंदे , सर्वेश होनराव व त्याचबरोबर अभिषेक जिवणे, वेदांत यंगाले या विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल घेऊन यश संपादन केले. तसेच वर्ग सातवी मधून गोल्ड मेडल मिळवलेले विद्यार्थी केतकी डिगे, प्रज्ञा ढगे, मारुती घुगे, कृष्णा नरहरे, अक्षरा सुरनर या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था सचिव माधवराव हालगरे, संस्थाध्यक्षा भारतबाई सावळे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवशंकर जिवणे , माध्यमिकचे मुख्याध्यापक मारोती बिरादार व आनंद हलगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे वर्षा खोंडे, मिथुन वाडीकर, महादेव बिरादार आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!