किलबिलचे मॅथ ऑलिंपियाड परीक्षेत घवघवीत यश

किलबिलचे मॅथ ऑलिंपियाड परीक्षेत घवघवीत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कुल शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2022-23 वर्षात आयोजित केलेल्या मॅथ ऑलिम्पियाड परीक्षेत एकूण 58 सुवर्ण पदक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेमध्ये गणित, विज्ञान व इंग्रजी अशा तीन विषयांच्या ऑलिम्पियाड या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते.नुकताच मॅथ विषयाचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये इयत्ता 1 ली ते 8 वी वर्गातील विद्यार्थ्यांना एकूण 58 सुवर्णपदक पटकावले सदरील सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील गणित विषयाचे शिक्षक उज्वला परचंडे, सुखात्मा ढोकाडे, मिरा पेठे, सुंदर चाटे,बळवंत डोंगरे, शिवराम सूर्यवंशी, नरसिंग जगताप, धर्मराज घोगरे, ज्ञानेश्वर जाधव, इत्यादी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेच्या वतीने संस्था सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, पर्यवेक्षक महावीर गोडभरले आदींनी सर्व गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा शाळेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!