करडखेल गांव ते कुमठा खु. अत्यंत जुना गाडीमार्ग- शेतरस्ता अतिक्रमण मुक्तीचा शुभारंभ
उदगीर(एल.पी.उगीले) : लातूर जिल्हाचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या संकल्पनेतून प्रत्येक गांवातील गांव नकाशावरील व परंपरागत वहीवाट रस्ते २४ एप्रिल२०२३ पर्यंत लातूर जिल्हा अतिक्रमणमुक्त वहीवाट शेत रस्ते करण्याची मोहीम उदगीर तालुक्यात जोर धरत असून यासाठी प्रविण मेंगशेट्टी उपविभागीय अधिकारी, रामेश्वर गोरे तहसीलदार यांनी प्रशासनातील सर्व यंत्रणा या कामात झोकुन देऊन काम करत आहेत. त्यात महसूल विभाग, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, व उपअधिक्षक भुमी अभिलेख हे सतत कार्यरत आहेत. या कामासाठी उदगीर तालुकाचे गट विकास अधिकारी महेश सुळे, उपअधिक्षक भुमी अभिलेख राजेंद्र भांबड, उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, अनिल पवार पोलीस निरीक्षक उदगीर ग्रामीण यांनी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे उदगीर तालुका सर्वात अगोदर अतिक्रमणमुक्त शेत रस्ते करण्यात अग्रेसर आहे.
मौजे करडखेल येथे करडखेल गाव ते कुमठा खु. जाणारी अत्यंत जुन्या काळातील गाडीमार्ग – शेतरस्ता अतिक्रमण मुक्त करण्याचा शुभारंभ प्रविण मेंगशेट्टी यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी सांगीतले की, या कामात हायगाय, टाळाटाळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. हे काम राष्ट्रीय काम म्हणून सर्वानी भाग घेऊन करा, याप्रसंगी उपस्थित रामेश्वर गोरे तहसीलदार यांनी सांगितले की, हे काम करत असताना कोणी जाणुन बुजुन अडवणूक करीत असेल तर त्यांचीही गय केली जाणार नाही. तरी आपण तालुकातील सर्व रस्ते जिल्हाधिकारी लातूर यांनी दिलेल्या सुचने नुसार लवकर आतिक्रमण मुक्त करावे. करडखेल येथे पंडित जाधव मंडळ अधिकारी, संतोष पाटील तलाठी, संजय जाधव भुमापक , बिरादार मॅडम भुमापक, प्रल्हाद कानुरे ग्रामसेवक, एकनाथ कसबे पोलीस पाटील , मधुकर कांबळे कोतवाल यांनी आयोजन केले होते. यावेळी सुनील केंद्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस , दिलीप होनाळे, मनोहर हत्ते, गोविंद मातनकर, सुभाष मातनकर, रमेश होनाळे, तुकाराम मातनकर , विठ्ठल होनाळे, विवेकानंद ढगे, पद्माकर कुंभार, बबन नरवटे, शिवाजी कांबळे, जितेंद्र कांबळे, बालाजी पूरी , संतोष जिंकलवाड यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी केले तर तलाठी संतोष पाटील यांनी आभार मानले.
