देवणी तालुक्यात पहिला उष्माघाताचा पहिला बळी
देवनी (प्रतिनिधि) : देवणी तालुक्यातील बोळेगाव येथे तिव्र उन्हाचा पारा चढत असून नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे.देवणी तालुक्यातील बोळेगाव येथील शेतकरी निवृत्ती देवराव गायकवाड यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. शेतकरी निवृत्ती देवराव गायकवाड हे सकाळी शेतातील कडबा गोळा करण्यासाठी व गाजर गवत कापण्यासाठी शेताकडे गेले होते. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने दुपारी त्यांना त्रास जाणवू लागला, त्यामुळे ते झाडाखाली बसून पाणी पिले. काही वेळाने उलट्या झाल्या.तो त्रास सहन करत ते घराची ओढ धरून घराकडे निघाले, घरी पोहोचताच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.या घटनेमुळे गायकवाड परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे.