स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निकचा 100 टक्के निकाल
यशाची परंपरा कायम : मराठवाड्यात सर्वोत्कृष्ठ निकाल
लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या हिवाळी परिक्षा 2020 मध्ये स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निकचा निकाल 100 टक्के लागलेला आहे. यामध्ये प्रथम,द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमिवर विद्यार्थ्यांची ऑनलाईन घेण्यात आली असली तरी सिव्हिल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या तीनही विभागाचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे.
यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंगच्या सय्यद शिफा या विद्यार्थ्यीनिने 98 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. सिव्हिल विभागातील ओमसिंह गहेरवार व दिग्विजय भातलवंडे या विद्यार्थ्यांने 96 टक्के गुण घेवून संयुक्तरित्या प्रथम क्रमांक मिळविला. तर अजय माने या विद्यार्थ्यांने 95 टक्के गुण घेवून द्वितीय क्रमांक तर प्रतिक अंबुलगे या विद्यार्थ्यांने 93 टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. मेकॅनिकल इंजिनियर मधून उध्दव संपत्ते हा विद्यार्थी 96 टक्के गुण घेवून प्रथम शंतनु जेवळीकर 94 टक्के गुण घेवून द्वितीय तर सौफिक सय्यद 91 टक्के गुण घेवून तृतीय आलेला आहे.
इलेक्ट्रीकल इंजिनियर मधून प्रियंका ढगे ही विद्यार्थिंनी 92 टक्के गुण घेवून प्रथम, आदित्य लोहार 91 टक्के गुण घेवून द्वितीय तर वैष्णवी नरारे 90 टक्के गुण घेवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. कॉम्प्युटर इंजिनियरींगमध्ये दिपक राठोड 96 टक्के गुण घेवून प्रथम, दिपक आवाड, अक्षता कुंभेजकर व सौरभ भालेराव हे तीनही विद्यार्थी 91 टक्के गुण घेवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे. तर शेख अब्दुल जबार हा विद्यार्थी 90 टक्के गुण घेवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरींगमध्ये सय्यद शिफा ही विद्यार्थीनी 98 टक्के गुण घेवून प्रथम, निखील पुजारी 93 टक्के गुण घेवून द्वितीय तर ऐश्वर्या कारंडे, प्रतिमा बिबराळे, शंतनु जावळेकर व अमीत कानडे हे चार विद्यार्थी 89 टक्के गुण घेवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांच्या यशाबद्दल जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेच्या सचिव तथा माजी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, संस्थेचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील, समन्वयक विनोद जाधव, इस्टेट मॅनेजर चंद्रशेखर पाटील, प्राचार्य साखरे, उपप्राचार्य मोरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचार्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.