ऑनड्युटी पोलिसांना चहा व नाश्ता वाटप

ऑनड्युटी पोलिसांना चहा व नाश्ता वाटप

पुणे (रफिक शेख) : भाजपा कला व सांस्कृतिक आघाडी व आपुलकी महिला व बालविकास संस्था पुणे यांच्यावतीने लॉकडाऊन काळात ऑनड्युटी सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचारी यांना चहा व नाश्ता याचे वाटप कारण्यातआले.

अलका टॉकीज चौक येथे जेष्ठ रंगकर्मी व सिने अभिनेते सुनीलनाना गोडबोले व मा.नगरसेवक व भाजपा शहर उपाध्यक्ष मा.धनंजय जाधव यांच्या आणि खंडूजीबाबा चौक येथे भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष मा.सुनील पांडे व शिवाजीनगर सरचिटणीस मा. गणेश बगाडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच काल फडके हौद चौक येथे पोलिसांना चहा व नाश्ता याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बारा बलुतेदार संघाचे प्रदेश अध्यक्ष रामदास सूर्यवंशी, पुणे शहर (कला)महिला अध्यक्ष वृषालीताई दुबे, आर.एस. एस चे मा.मुकुंदराव सहस्त्रबुद्धे काका, भाजपा शिवाजीनगर महिला आघाडी उपाध्यक्ष कु.मंजुताई वाघमारे, रवी ओव्हाळ,रुपाली चव्हाण, सचिन साखरे,संभाजी पोलीस चौकीचे पी.एस.आय.विष्णु देशमुख साहेब व पो.ह.जाधव साहेब आणि त्यांचे सहकारी कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाचे संयोजन कला व सांस्कृतिक आघाडीचे सरचिटणीस शैलेश बडदे व आपुलकी बालविकास संस्थेचे अध्यक्ष बाबू नाईक यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!