केंद्रेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात खांब तेथे लाईट

केंद्रेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात खांब तेथे लाईट

अहमदपूर( गोविंद काळे ) : तालुक्यातील केंद्रेवाडी येथे ग्रामपंचायत कडून खांब तेथे लाईट( फोकस ) योजना राबवण्यात आली आहे जि.प. सदस्य अशोक काका केंद्रे व पंचायत समिती माजी सभापती अध्योध्या ताई केंद्रे यांनी गाव दत्तक घेऊन अनेक समाज उपयोगी योजना खेचून आणून गावात राबवल्या आहेत व गावचा विकास करून आदर्श गाव केले आहे त्यांनी उच्च शिक्षीत महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक श माधव केंद्रे यांच्या उच्च शिक्षीत पत्नी सौ ज्योती माधव केंद्रे यांना बिनविरोध सरपंच बनवले आहे
तरी नवनिर्वाचित सरपंच , उपसरपंच , सदस्य मंडळ व ग्रामसेवक यांची बैठक घेऊन खांब तेथे लाईट ( फोकस ) योजना राबवली आहे यात त्यांनी गावातील प्रत्येक खांबावर एक फोकस लावून एक नवीन आदर्श निर्माण केला आहे गाव सर्वत्र प्रकाश मय झाले आहे यात त्यांनी एकूण जि.प शाळेसह 42 फोकस लावले आहेत यात गाव उजळून निघाले आहे
या फोकस साठी येणारा खर्च हा ग्रामविकास निधी खाते नंबर 01यातून करण्यात आला अशोक काका केंद्रे यांनी सुध्दा माझे गाव म्हणून काही मदत केली आहे यात खांब तेथे फोकस मुळे गावकरी सर्वत्र अशोक काका केद्रे माजी सभापती सौ . अयोध्याताई केंद्रे तसेच सरपंच सौ . ज्योती माधव केंद्रे उपसरपंच सौ . ज्योती बालाजी केंद्रे , ग्रामसेवक एम.एस.केंद्रे . सर्व ग्रामपंचात सदस्य सौ .इंद्रायणी भानुदास केंद्रे सौ, पुष्पा प्रकाश केंद्रे भानुदास रंगनाथ केंद्रे, ज्ञानोबा भास्कर केंद्रे व तुकाराम मनोहर केंद्रे यांचे सर्व गावकरी कौतुक करत आहेत

About The Author