अहमदपुर चाकूर साठी तातडीने कोव्हीड हाॅस्पीटलची उभारणी करा..!!

अहमदपुर चाकूर साठी तातडीने कोव्हीड हाॅस्पीटलची उभारणी करा..!!

सम्राट मित्रमंडळाची मागणी

अहमदपूर ( गोविंद काळे )
अहमदपूर आणी चाकूर तालुक्यामधील कोवीड च्या रूग्णांना उदगीर व लातूर शिवाय पर्याय राहीला नसून जिल्हा प्रशासनाने आता तातडीने या दोन तालुक्यासाठी कोव्हीड रुग्णालयाची स्थापना करावी अशी आग्रही मागणी येथील युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

येथील सम्राट मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,अहमदपूर आणी चाकूर या दोन्ही तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात कोव्हीड च्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्यांची ऐपत आहे असे रूग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.मात्र सर्वसामान्य रूग्नाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे त्यांचे नातेवाईक सांगत आहेत.ऑक्सीजन अभावी,इंजेक्शन अभावी या परिसरातील अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे ही वस्तुस्थिती आहे.या साठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पुढाकार घेवून अहमदपूर व चाकूर साठी स्वतंत्रपणे किमान 100 खाटांचे ऑक्सिजन बेड युक्त कोव्हीड हॉस्पिटलची उभारणी करून या भागातील रूग्नांना या कठीण समयी साथ द्यावी यासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून तातडीने निधी उपलब्ध करून घ्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

या निवेदनाच्या प्रती अहमदपूर चाकूर चे आमदार बाबासाहेब पाटील, अहमदपूरचे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तहसिल कार्यालय,मुख्याधिकारी नगर परिषद,आणी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रूग्णालय यांना देण्यात आले आहेत.

About The Author