युवकांनी दिले हरणाच्या पाडसाला जिवदान…….. !
अहमदपूर( गोविंद काळे ) तालुक्यातील सुनेगाव (शेंद्री) येथील चार युवकांनी दि १९ एप्रिल रोजी सायंकाळी रोडच्या कडेला असलेल्या एका भल्या मोठ्या खड्यात पडलेल्या हरणाच्या पाडसाला खड्यातुन बाहेर काढून दिले जिवदान.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव(शेंद्री) शिवारात सुमठाना रोडच्या कडेला शेतकऱ्यांनी खोदलेल्या भल्या मोठ्या खड्यात हरणाचे पाडस सायंकाळी पडले होते खड्यामधुन बाहेर येण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाडसाचा धडपडत असलेला आवाज बाजुलाच शेतात काम करत असलेले युवक सुरज श्रीमंगले ,दिपक श्रीमंगले यांना एैकु आला असता रस्त्यावरुन जाणारे आपले मित्र मंगेश जायभाये, ऋषीकेश जायभाये तसेच पत्रकार गोविंद काळे यांना थांबुन घेऊन हरणाच्या पाडसाडा खड्यातुन बाहेर काढले व लगेच प्रत्रकार गोविंद काळे यांनी वन क्षेत्रपाल कोंपलवार यांना भ्रमनध्वनी द्वारे माहीती कळवली व त्यांनी लागलीच वन विभागाचे कर्मचारी शंकर केंद्रे, नारायण पिलवटे यांना पाठवून दिले संध्याकाळी सदरील हरणाचे पाडस चार युवकांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या स्वाधिन केले यावेळी पत्रकार गोविंद काळे,गंगाराम जायभाये, मनोज जायभाये, यांच्यासह चिमुकले प्रतिक काळे, पियुश काळे, अयुश काळे, प्रगती काळे आदींची उपस्थिती होती.