राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली राष्ट्रीय महामार्गची पाहणी

राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली राष्ट्रीय महामार्गची पाहणी

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 752K – औराद शहाजनी – निटूर – लातूर रस्त्याच्या कामाची राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी अचानक पाहणी केली.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत सुरू असलेल्या 752K जहिराबाद – औराद शहाजनी-निटूर-लातूर रस्त्याच्या कामाची मसलगा ता.निलंगा व बाभळगाव ता. लातूर येथे अचानक पाहणी करत यावेळी संबंधितांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार काम करण्याच्या सुचना राज्यमंत्री मा.ना.संजय बनसोडे यांनी संबंधिताना दिल्या. यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर रमेश गाढवे, कन्सल्टंट दिपक गोयल, स्ट्रक्चर इंजिनिअर सुरज चव्हाण, कॉंग्रेसचे नेते अभय साळुंके, निलंगा रा.कॉ.शहराध्यक्ष इस्माईल नदाफ, रा.यु.कॉं.तालुकाध्यक्ष उल्हास सुर्यवंशी, धम्मानंद काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!