जागतिक वसुंधरा दीन साजरा;नागरिकांनी पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी झाडे लावा – रेखा लांडे
वाशिम (राम जाधव) : काजळेश्वर येथे जागतिक वसुंधरा दिवस साजरा. पर्यावरण संरक्षणासाठी संपूर्ण जगभरात 22 एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो.
या दिनाचे औचित्य साधून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास तसेच भाग्योदय पर्यावरण टीमच्या वतीने वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण विषयी जनजागृती निर्माण व्हावी याकरिता हा कार्यक्रम घेण्यात आला .
पृथ्वी आणि तिच्या सभोवतालची पर्यावरणे ही आपली संपती आहे. म्हणून निसर्ग, पर्यावरण आणि वसुंधरा यांचेशी सुसंवाद,एकोपा व संगती प्रस्थापित करणे गरजेचे आहे.
वसुंधरा ही मानवी जीवन, सजीव प्रजाती आणि वसुंधरा यांचे परस्परा वलंबित्व प्रतिबिंबित करते . वसुंधरेच्या पोटात सर्व समावेशकता आहे. म्हणून निसर्गाशी बिघडलेले संबंध पुन्हा स्थापित करून जोपासणे व त्यासाठी जगभरातील लोकांना एकत्रित आणने ही आपली सामुहिक जबाबदारी आहे.
झाडे हवामान बदलाशी झुंज देण्यास सजीवांना मदत करतात. … झाडे सजीव प्रजाती नष्ट होण्यापासून वाचविण्यास मदत करतात …
झाडे स्वछ श्वसनास मदत करतात ….
झाडे समाजाला आणि त्यांच्या उपजीविकेला मदत करतात… वसुंधरा आहे म्हणून सजीव आहेत.
झाडे लावा, झाडे जगवा , निसर्ग वाचवा , पर्यावरण संतुलित ठेवा आणि पृथ्वीवरील मानवी जीवन व सजीव प्रजाती समृध्द करा …..
निसर्ग हेच खरे दैवत आहे हा संदेश देण्यात आला…
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्ये कारंजा तालुका अध्यक्ष, सचिव रेखा लांडे, भाग्योदय पर्यावरण टीमच्या पदाधिकारी शितल सावरकर, रूपाली गांवडे,आशा लांडे, राजकन्या गांवडे, ईश्वरी सावरकर, सिद्धी सावरकर व इत्यादी…