1704 रुग्णांनी कोरोनावर केली मात
नवीन 1400 कोरोनाबाधित रुग्ण
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 47439 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1400 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 1620 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 553 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 3307 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 847 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63997 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15451 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1107 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 47439 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची 1704 आहे.