केंद्रेवाडी ग्रामपंचायतीकडून मास्क वाटप व सोडियम हायपोक्लोराईडने गाव फवारणी

केंद्रेवाडी ग्रामपंचायतीकडून मास्क वाटप व सोडियम हायपोक्लोराईडने गाव फवारणी

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील केंद्रेवाडी ग्रामपंचायतीसाठी मा.सभापती सौ . अयोध्याताई केंद्रे व जि.प. सदस्य यांनी कोरोना संसर्गजन्य रोगावर मात करण्यासाठी मास्क वाटप व सोडियम हायपोक्लोराईडने फवारणी केली आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी, तालुक्यातील केंद्रेवाडी या केंद्रे दाम्पत्य यांनी गावात भरपूर योजना खेचून आणून गावचा विकास साधला आहे त्यांनी गावासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहेत त्यांनी गावासाठी उच्च शिक्षीत सरपंच बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केलेले आहेत ग्रामपंचायतीने खांब तेथे फोकस योजना राबवल्यानंतर जगावर आलेल्या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक व्यक्ति एक मास्क योजना राबवण्यात आली जि.प सदस्य अशोक काका केंद्रे यांच्या उपस्थितीत गावात एक व्यक्ति एक मास्क यात 1000 मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी त्यांनी मास्क वापरा वारंवार हात धुवा एकत्र गावात बसू नका अशा विविध सूचना दिल्या त्यामुळे नागरीक गावात मास्क वापरत आहेत
तसेच त्यांच्या उपस्थित गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईडने गाव फवारणी केली तसेच प्रत्यक आठवड्याला अशी फवारणी ग्रामपंचायतकडून केली जाणार आहे कोरोना काळात सर्व नागरीक यांनी सावध रहावे म्हणून गावात दवंडी देऊन तसेच स्पीकरद्वारे दररोज सूचना दिल्या जात आहेत यामुळे गावकऱ्याकडून जि.प. सदस्य अशोक काका केंद्रे , महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक माधव केंद्रे ,सरपंच सौ . ज्योती माधव केंद्रे उपसरपंच सौ.ज्योती बालाजी केंद्रे,ग्रामसेवक केंद्रे एम एस विदयुत व्यवस्थापक गजेंद्र केंद्रे ग्रामपंचायत सेवक सुधाकर केंद्रे ग्रामपंचायत सदस्य इंद्रायणीबाई भानुदास केंद्रे , सौ.पुष्पा प्रकाश केंद्रे श्री भानुदास रंगनाथ केंद्रे श्री ज्ञानोबा भास्कर केंद्रे श्री तुकाराम मनोहर केंद्रे यांचे गावकऱ्यां कडून सर्वत्र कौतुक केले जात आहे.

About The Author