अहमदपूर येथे नवीन दहा बेडच्या कोविड सेंटरला मान्यता
कदम हॉस्पिटल ला कोविड सेंटर ची परवानगी – आज पासूनच रूग्णसेवेला सुरुवात
अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोणा या साथीच्या महाभयानक रोगाने या शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात चांगलेच हातपाय पसरले असून दिवसेंदिवस येथे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. याबरोबरच तालुक्यात मृत्यूचे प्रमाणात कमालीची वाढ होत आहे.रुग्णांची येथेच सोय व्हावी या दृष्टीने अहमदपूर येथे कदम हॉस्पिटल ला दहा रुग्णांची ऑक्सीजन बेड सह नव्याने मान्यता मिळाली असून तशी सुविधा येथे करण्यात आली आहे. आता या परिसरातील रुग्णांची फरफट-धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.
अहमदपूर शहर व ग्रामीण भागात कोरोना या साथीच्या रोगाने कहर केला आहे या भागातील रुग्णांना येथे उपचार घेण्याची सुविधा खूप कमी आहे येथे रुग्णांना कुठेही चांगली सुविधा नाही बॅड उपलब्ध होत नाहीत म्हणून येथील रुग्ण लातूर सोलापूर हैदराबाद येथे उपचारासाठी जात आहेत या मोठ्या शहरातील आणि मोठ्या रुग्णालयातील खर्च भरमसाठ न परवडण्यासारखा आहे सर्व खर्च लाखांवर यायचा व रुग्ण राहील किंवा नाही याची शाश्वती नव्हती या शहरातील हैदराबाद सोलापूर गेलेल्या अनेक रुग्णांचे निधन झाले आहे. यामुळे या भागातील कोरोणा रुग्णांनी चांगलीच धास्ती घेतलेली आहे. आता रुग्णांना येथेच सुविधा झाल्यामुळे बरे होणार आहे.
या भागात चांगली अक्सिजन बेडची व्यवस्था येथे शहरात एकाच ठिकाणी होती.तेथे खूप लोड होता. बेड मिळत नव्हती. आता ही नव्याने येथे मान्यता मिळाल्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची आता येथे चांगली सोय होणार आहे .रुग्णांची धावपळ व त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.हे कोरोना सेंटर 40 खाटापर्यंत होणार असल्याचेही सांगण्यात आले. या कोरोना सेंटर येथे बाय पॅप व एक मेकानिकल व्हेंटीलेटर ची सुविधा असून येथे नवीन 2 व्हेंटीलेटर ची ऑर्डर दिल्याचेही सांगण्यात आले. येथे रुग्णांवर उपचार करणारे डॉ. पांडुरंग कदम हे ‘हृदय रोग तज्ञ ‘असून गोल्ड मेडलिस्ट आहेत.
अहमदपूर तालुक्यात रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे येथे रुग्णांना सोय नव्हती. यामुळे उपचारासाठी लातूर ,सोलापूर, हैदराबाद पर्यंत नातेवाईक रुग्णांना घेऊन जात होते.खर्चही भयानक येत होता व रुग्ण राहील किंवा नाही याची हमी नव्हती. पण आता येथे सुविधा झाल्यामुळे रुग्णांना व नातेवाईकांना याची चांगली सोय होणार आहे. रुग्णाला रोज डोळ्यासमोर पाहायला मिळणार आहे. शासनाच्या नियमानुसारच येथे सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.