दिव्यांगाचे अनुदान तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करा – सम्राट मित्रमंडळाची मागणी

दिव्यांगाचे अनुदान तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करा - सम्राट मित्रमंडळाची मागणी

अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातील महानगरपालीका, नगरपालिका तसेच नगरपंचायत क्षेत्रातील अपंगाचे(दिव्यांगाचे)सर्वेक्षण करण्यात आले असून शासनाच्या निर्देशानुसार 

संबंधितांच्या खात्यावर हे अनुदान तातडीने वितरीत करावे अशी आग्रही मागणी सम्राट मित्र मंडळाच्या वतीने युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

सम्राट मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,नागरी क्षेत्रातील दिव्यांगाच्या प्रमाणानुसार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. संबंधीत महानगरपालीका/नगरपालीका/नगरपंचायत यांच्या कार्यालयाकडे या याद्या उपलब्ध आहेत.एकूण उत्पन्नापैकी तीन टक्के इतका निधी अपंगावर(दिव्यांगावर)खर्च करणे शासनाने बंधनकारक केलेले आहे.मात्र अपंग(दिव्यांगा)चा निधी संबंधितांच्या खात्यावर टाकण्यासाठी अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याच्या दिव्यांग बांधवांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

या पूर्वी सदरील अपंगांना (दिव्यांगाना) सदरील नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधीचे वाटप केले आहे.मात्र  गेल्या अनेक महिन्यांपासून अनुदानाचे वाटप केलेले नसल्याचे समजते.सध्या लाॅकडावून असल्याने अपंग (दिव्यांग) नागरिक खूप अडचणीत आहेत.अशा प्रसंगी त्यांना मानवतेच्या भावनेने मदत करणे आद्य कर्तव्य आहे.केवळ औसा नगरपालीका वगळता इतरांनी हा निधी दिला नाही.

म्हणून या प्रकरणी वैयक्तीक लक्ष घालून तातडीने अपंगाचे (दिव्यांगाचे) अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत संबंधीत महानगरपालीका/नगरपालिका/नगरपंचायत यांना सूचना करावी असे नमूद करण्यात आले आहे. अन्यथा या प्रकरणी दिव्यांगाना सोबत घेवून नाविलाजाने अंदोलन करावे लागेल असा इशाराही प्रशासनाला दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाप्रशासन अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय लातूर, आयुक्त,महानगरपालिका,लातूर,मुख्याधिकारी,नगरपालिका,अहमदपूर,निलंगा,उदगीर,तसेच मुख्याधिकारी,नगरपंचायत शिरूअनंतपाळ,जळकोट, देवणी,चाकूर,रेणापूर यांच्याकडे मेलद्वारे देण्यात आलेल्या आहेत.

About The Author