१०५ वर्षाच्या जेष्ठ दांम्पत्याने कोरोना ला हरवले

१०५ वर्षाच्या जेष्ठ दांम्पत्याने कोरोना ला हरवले

कोरोना ला घाबरु नका दांम्पत्याचे आवाहन

लातूर (प्रतिनिधी) : कोरोना म्हटले की सध्या अंगावर काटा उभा राहतो मात्र याला घाबरायच नाही. वेळेवर उपचार केल्यास तो बरा होतो त्यासाठि अंगावर काही न काढता वैद्यकीय सल्ला घेतल्यास तो आजार पुर्णपणे बरा होतो. असाच अनुभव वयाची १०० वर्ष पूर्ण झालेल्या लातूर तालुक्यातील काटगाव तांडा येथील धेनु उमाजी चव्हाण वय वर्ष १०५ व त्यांच्या पत्नी मोताबाई चव्हाण वय ९५ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते लातूर येथील विलासराव देशमुख शासकिय वैद्यकिय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल झाले आणि अवघ्या सात दिवसात कोरोनाच्या आजारावर मात करून घरी परतले विशेष म्हणजे लातूरच्या विलासराव देशमुख शासकिय वैद्यकिय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मोफत वैद्यकीय उपचार करून कोरोना ला हरवले आहे. त्यामूळे कोरोना घाबरु नका असा संदेश कोरोनावर मात केलेल्या १०५ वर्षीय धेनु चव्हान यांनी बोलताना सांगितले.

लातूर तालुक्यातील काटगाव तांडा येथील रहिवासी असलेल्या चव्हान दांपत्यास कोरोना ची लागण झाल्याने हे कुटुंब प्रचंड तणावात होते. घाबरून गेले होते त्यांचे पुत्र सुरेश चव्हाण यांनी तात्काळ विलासराव देशमुख शासकिय वैद्यकिय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉ शैलेंद्र चौहान, डॉ गजानन हलकांचे, डॉ धर्माधिकारी यांनी या १०० पार केलेल्या कोरोना रुग्णावर योग्य रीतीने उपचार सुरू करून त्यांना अवघ्या सात दिवसात तंदुरुस्त करून घरी पाठवले आहे. विशेष म्हणजे लातूरच्या विलासराव देशमुख शासकिय वैद्यकिय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणावर वैधकिय अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्याने १०० वय पूर्ण केलेल्या दाम्पत्यांना कोरोना च्या जोखडातून मुक्त करण्यात आले आहे. आज हे दोन्ही जेष्ठ नागरीक चव्हान दांपत्य ठणठणीत असून कोरोनाला घाबरु नका उपचार योग्य घेतल्यास तंदुरुस्त होतो असे आवाहन त्यांनी केले आहे.

कठीण परिस्थितीत माझ्या आई वडिलांना नेत्यांनी दिलेला आधार आठवणीचा ठेवा – सुरेश चव्हाण

कोरोनाच्या भीषण संकटात सापडलेल्या माझ्या आई वडिलांना कोरोना झाल्याची घटना कळाली मन सुन्न झाले तात्काळ पालकमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार धीरज देशमुख ही गोष्ट यांच्या कानावर घातली तसेच आमचे स्नेही मित्र पत्रकार हारिराम कुलकर्णी यांना बोललो तात्काळ शासकिय वैद्यकिय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय उपचार व्हेंटिलेटर लावले खूप घाबरुन गेलो होतो. मात्र डॉक्टरांनी संयम बाळगावा उपचार योग्य रीतीने होऊन जाईल असा सल्ला दिला अवघ्या सात दिवसात १०० वर्ष पूर्ण केलेल्या माझ्या आई वडिलांना कोरोनातून मुक्त करून डिस्चार्ज मिळाला सुखरूप घरी परत आले पुनर्जन्म मिळाला आहे ते केवळ माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख व सातत्याने भक्कम आधार देणारे पत्रकार हरिराम कुलकर्णी तसेच डॉक्टर मंडळी यांना कधीच विसरू शकत नाही. अशी भावना चव्हाण कुटुंबाचे सुपुत्र सुरेश चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. लोक सरकारी दवाखान्यात उपचार करायला नको म्हणतात पण लातूरच्या विलासराव देशमुख शासकिय वैद्यकिय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये ज्या वैद्यकीय उपचार पद्धती अस्तित्वात आल्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने माझ्या आई वडील यांना पुनर्जन्म मिळाला आहे सलाम डॉक्टर लोकांना धन्यवाद देतो.

About The Author