हातभट्टी तांड्यावर एलसीबी छापा; 3 लाख 87 हजाराचा मुद्देमाल जप्त

हातभट्टी तांड्यावर एलसीबी छापा; 3 लाख 87 हजाराचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा व रेणापुर पोलीसांची संयुक्त कारवाई

लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारू ची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिले आहेत. याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी, चाकूर विद्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, रेणापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या नेतृत्वाखाली रेणापूर तालुक्यातील वसंतनगरतांडा येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणारे 07 इसमावर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर व रेणापुर पोलिस ठाणे यांच्या पथकाने दि. 25 एप्रिल रोजी सकाळी छापेमारी केली. यामध्ये 81,000 लिटर रसायन व साहित्य असा एकूण किंमत 3 लाख 87 हजार रुपये चे रसायन आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नष्ट करण्यात आले आहे. या कार्यवाहीत सुखदेव खंडू राठोड (रा. वसंतनगर तांडा), रमेश भाऊसाहेब चव्हाण (रा.वसंतनगर तांडा), बालाजी भानुदास चव्हाण (रा.वसंतनगर तांडा), विनायक भानुदास चव्हाण (रा.वसंतनगर तांडा), फुलाबाई गणू चव्हाण (रा.वसंतनगर तांडा), बालाजी सुखदेव राठोड (रा.वसंतनगर तांडा), बाबाराव माणिक पवार (रा.वसंतनगर तांडा), ता. रेणापुर जि.लातूर अशा एकूण 07 आरोपीवर रेणापुर पोलीस ठाणे येथे एकूण 07 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

सदरील कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार संजय भोसले, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, राजेंद्र टेकाळे, प्रकाश भोसले, रामहरी भोसले, युसुफ शेख, राहुल सोनकांबळे, प्रमोद तरडे, रामदास नाडे, नितीन कटारे, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, हरून लोहार, यशपाल कांबळे, नागनाथ जांभळे, प्रदीप चोपण तसेच रेनापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार गुळभिले, पोलीस नाईक ठाकरे, महिला पोलीस अंमलदार पवार यांनी ही संयुक्त कार्यवाही करत परिश्रम घेतले.

About The Author