1644 बहाद्दरांनी कोरोनाला पाजले पाणी
नवीन 1522 कोरोनाबाधित रुग्ण
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 49083 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1644 आहे. तर नवीन 1522 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
लातूर जिल्ह्यात 1117 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 472 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 3461 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 1050 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 65506 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15291 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1132 रुग्णांचा मृत्यू झाला असून आज उपचारादरम्यान 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.